रशिया-युक्रेन युद्धाचा आज सतरावा दिवस आहे. युद्धाच्या सतराव्या दिवशीही रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरू असून रशिया कीव शहर ताब्यात घेण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. दरम्यान, रशियाने युक्रेनवर केलेल्या युद्धाचा निषेध करत अनेकांनी रशियावर प्रतिबंध लावले आहेत. त्यामुळे रशियावर प्रतिबंध लादल्यामुळे रशियाने खतांची निर्यात रोखली असल्याची घोषणा रशियाच्या उद्योगमंत्र्यांनी केली आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन प्रशासनाने खतांची निर्यात स्थगित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे रशियाचे उद्योग मंत्री डेनिस मँतुरोव्ह यांनी सांगितले. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी पाश्चात्य जगाच्या निर्बंधांचे नकारात्मक परिणाम होतील असा इशारा दिल्यानंचक ही घोषणा करण्यात आली आहे.
रशिया दरवर्षी ५० दशलक्ष टन खतांचे उत्पादन करते. हे उत्पादन जगातील एकूण उत्पादनाच्या १३ टक्के आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.