‘नवाब मलिक, तुमच्याविरोधात कारवाई का करू नये?’ – उच्च न्यायालय

‘नवाब मलिक, तुमच्याविरोधात कारवाई का करू नये?’ – उच्च न्यायालय

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. तसेच समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा दावाही मलिकांनी सादर केला आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांनी नवाब मलिकांविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला. या प्रकरणावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. नवाब मलिकांनी उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई का करू नये? अशी विचारणा उच्च न्यायालयाने नवाब मलिकांना केली आहे.

वानखेडे कुटुंबियांनी मलिकांवर केलेल्या दाव्या विरोधात याआधी न्यायालयात सुनावणी झाली  होती. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिकांना वानखेडेंविरोधात टिप्पणी करू नयेत, असा आदेश दिला होता. मात्र मलिकांनी वानखेडेंवरील टीकास्त्र सुरूच ठेवले. मलिकांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही.

नवाब मलिकांनी न्यायालयाच्या नियमांचे पालन न केल्यामुळे आज मुंबई उच्च न्यायालयाने मलिकांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा निष्कर्ष नोंदवला आहे. तसेच न्यायालयाने नवाब मलिकांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले असन याप्रकरणी पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. तसेच न्यायालयाचा आदेश तुडवल्यामुळे आता मलिकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version