हरतालिका गौरी विसर्जनास गेलेले चौघे नदीत बुडाले, एका महिलेचा मृत्यू, तिघेजण बेपत्ता

हरतालिका गौरी विसर्जनास गेलेले चौघे नदीत बुडाले, एका महिलेचा मृत्यू, तिघेजण बेपत्ता

हरतालिका  गौरी विसर्जनासाठी गेलेल्या चौघे नदीत बुडल्याची घटना हिंगणघाट येथील वणा नदीच्या कवडघाट येथे घडली आहे. हरतालिका  गौरी विसर्जनादरम्यान दोन महिला व दोन मुले हिंगणघाट येथील वणा नदीच्या कवडघाट नदीघाटावर गौरी विसर्जन करण्यासाठी गेले होते. गेलेल्या महिलांपैकी दोन महिला व दोन मुले वाहून गेली. त्यापैकी एका महिलेला पोलिसांनी नदीतून काढले परंतू उपजिल्हा रुग्णालयात नेताना त्यांचा मृत्यू झाला आहे.

नेमकं काय घडलं?

हिंगणघाटच्या शास्त्री वार्डातील काही महिला वणा नदी रेल्वे पुलाजवळ कवडघाट घाटावर हरतालिका  गौरी विसर्जन करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी रिया रंजित भगत यांच्या सोबत त्यांचा 10 वर्षाचा मुलगा अभि व 13 वर्षाची मुलगी अंजना हे दोघे सोबत होते .

आई सोबत नदीपात्रात गेलेला अभि वाहू लागल्याने बहीण अंजना त्याला वाचविण्यासाठी धावली . तीही पाण्यात बुडत असल्याचे दिसताच तिची आई रिया भगत ने धाव घेतली. या तिघांना वाहताना पाहून शेजारच्या दिपाली मारोती भट ने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु ती सुद्धा पाण्यात वाहू लागली.

याघटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी धाव घेतली. राष्ट्रीय महामार्गावरील वणा नदी पुलाजवळ एक महिला वाहून जात असल्याचे त्यांना दिसले. त्यावेळी पोलीस रामदास चाकोले यांनी नदीपाण्यात उडी मारून रिया भगतला पाण्याबाहेर काढले. त्यावेळी ती जिवंत होती. जागेवर प्राथमिक उपचार करून पोटातील पाणी काढले.  उपचारासाठी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. मात्र रुग्णालयात नेत असतांना ती मृत पावली. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version