बालाकोट हल्ल्यानंतर भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना मारहाण करणाऱ्या सुभेदार अहमद खान या पाकिस्तानी सैनिकाचा भारतीय सुरक्षा दलाने खात्मा केला आहे. काही दिवसांपासून पाकिस्तान शस्त्रसंधीचं उल्लंघन करतंय. त्यामुळे प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्याकडून केल्या गेलेल्या गोळीबारात सुभेदार अहमद खानचा मृत्यू झालाय.
सुभेदार अहमद खान याने अभिनंदन यांना बालाकोट हवाई हल्ल्यादरम्यान ताब्यात घेतलं होतं आणि चौकशी दरम्यान मारहाणही केली होती.
14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे भारतीय सैन्यावर झालेल्या हल्ल्याचा जबाब देताना भारताने बालाकोट हवाई हल्ला केला होता.
यानंतर पाकिस्तानच्या हवाई दलाने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता.
हा हल्ला परतवताना कमांडर अभिनंदन यांचं विमान 27 फेब्रुवारी रोजी पाकव्याप्त काश्मिरात कोसळलं होतं.
त्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी अभिनंदन यांना ताब्यात घेतलं.
त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना घेऊन जात असल्याचे जे फोटो प्रसिद्ध झाले होते, त्यात अभिनंदन यांच्या चेहऱ्यावर मारहाण झाल्याच्या खुणा दिसत होत्या.
याच फोटोत त्यांना घेऊन जाताना त्यांच्यामागे सुभेदार अहमद खान दिसत होता.
हाच सुभेदार अहमद खान भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळी नकियाल सेक्टरमध्ये भारतीय सैनिकांनी केलेल्या गोळीबारात तो ठार झाला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.