‘मी त्या महिलेला हातही लावला नव्हता’, विनयभंगाच्या व्हिडिओवर महापौर महाडेश्वर यांचा खुलासा

‘मी त्या महिलेला हातही लावला नव्हता’, विनयभंगाच्या व्हिडिओवर महापौर महाडेश्वर यांचा खुलासा

गेले तीन दिवस मुंबईत प्रचंड पाऊस पडतोय. प्रशासनाचा हलगर्जीपणाचं पितळ उघडं पडलंय. याबद्दल जाब विचारणाऱ्या महिलेचा हात मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर पिरगळताना दिसत आहेत.

मुसळधार पावसामुळे सांताक्रूजमधल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं.

यामध्ये 45 वर्षीय महिलेचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला.

तिला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या 26 मुलाचाही शॉक लागून मृत्यू झाला.

या घटनेनंतरही स्थानिक नगरसेवकांनी भेट दिली नाही.

याचा स्थानिकांमध्ये रोष होता.

बुधवारी महापौर जेव्हा भेट द्यायला आले, तेव्हा स्थानिक महिलांनी त्यांना घेराव घातला.

त्यावेळी महापौरांनी एका महिलेचा हात पिळला.

खुद्द महापौरांनीच महिलेचा विनयभंग केल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय.

संताक्रूज मध्ये महापौरांनी एका महिलेचा हात मुरगळल्याचा विडिओ व्हायरल झाल्या नंतर महापौरांनी मात्र त्याच स्पष्टीकरन दिलय.

व्हि डिओ मध्ये महापौरांनी हात मुरगळल्याच दिसत असतानाही मी हात पकडला नव्हता, असं महाडेश्वर यांनी म्हटलंय.

मी शिक्षक आहे मला महिलेशी कस वागायचं हे समजतं. असा पद्धतीने वागणं ही शिवसेनेची संस्कृती नसल्याचं महापौरांनी म्हटलंय.

हे मनसेच्या कार्यकर्त्यांनी राजकारण केलं असल्याचं महापौरांनी म्हटलंय…

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version