काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत मागील वेळी भाजपाचा पराभव झाला होता. मात्र, यावेळी निवडणूक जिंकायची आहे, असे आदेश महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पुन्हा पोटनिवडणूक होत आहे. या निवडणूकीत शिवसेना आणि काँग्रेस या मावितातील दोन्ही राजकीय पक्षांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. मागील निवडणुकीत ही जागा शिवसेनेने गमावली असल्याने आता माविआअंतर्गत शिवसेनेसाठी जागा सोडावी असा आग्रह केला जात आहे. मात्र, भाजपालाच कोल्हापूर पोटनिवडणूक जिंकायची असल्याचा आदेश भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले आहेत.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मंतदारसंघात होणारी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांना १७ मार्चपासून अर्ज दाखल करता येतील. तसेच १२ एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून १६ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.