मुंबई, १२ जुलै २०२३ , प्रतिनिधी : सर्वांच्याच घरात आजकाल सुका मेवा असतो. या सुक्या मेवाचे काही प्रचलित फायदे हे सर्वांना माहित आहेत. त्यामुळे आपण बऱ्याचदा आपल्या आहारात सुक्या मेव्याचा समावेश करतो. पण तुम्ही कधी बदामाचा चहा प्यायला आहे का? बदामाचा चहा हा आपल्या आरोग्यसाठी अत्यंत फायदेशीर असतो. तर बदामाचा चहा पिण्याचे फायदे आणि तो कसा बनवायचा ते जाणून घेऊय :
१. फायबर, मोनोसॅच्युरेटेड, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट, जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम आणि इतर अनेक पोषक घटक बदामामध्ये आढळतात. हे सर्व आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
२. बदामाचा चहा प्यायल्याने फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून तुमचे रक्षण होते. फ्री रॅडिकल्समुळे सुरकुत्या, चेहऱ्यावर डाग पडणे या समस्या निर्माण होतात. बदामाचा चहा पिऊन या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते.
३. बदामाचा चहा प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते. यामुळे शरीरातील विषजन्य पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. घातक रोग आणि संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.
४. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीरातील जळजळ कमी होते. सांधेदुखीसारख्या आजाराचा धोकाही कमी होतो.
५. बदामाचा चहा प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामुळे मेंदूचा झटका येण्याचा धोका कमी होतो. बदामामध्ये भरपूर मॅग्नेशियम असते जे मधुमेह असलेल्या लोकांसाठी उपयुक्त ठरू शकते.
बदामाचा चहा बनवण्यासाठी 10 ते 12 बदाम तीन ते चार तास पाण्यात भिजत ठेवा. आता सोललेले बदामांची मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट तयार करा. पातेल्यात एक कप पाणी घाला. पाणी उकळायला लागल्यावर त्यात बदामाची पेस्ट घाला आणि हे मिश्रण 10 ते 12 मिनिटे शिजू द्या. आता मिश्रण आचेवरून उतरवा. ते गाळून घ्या आणि चवीनुसार अर्धा चमचा मध घाला आणि प्या.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.