महिला लिलावाच्या मागे महिलाच?

महिला लिलावाच्या मागे महिलाच?

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने बुल्ली बाई ऍपवर कारवाई केली असन बंगळुरूयेथून २१ वर्षीय इंजिनीअरिंग विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्या तरुणाची १० तासांहून अधिक काळ चौकशी केली आहे. या चौकशीदरम्यान महिला लिलावाच्या मागे महिलाच आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

बुल्ली बाई या अॅपवर शनिवारी पत्रकारांसह १०० प्रमुख मुस्लिम महिलांचे फोटो लिलावासाठी अपलोड केले होते. याविरोधात सोमवारी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ‘बुल्लीबाई’ अॅप संदर्भात बंगळुरू येथील एका २१ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. त्याची १० तास चौकशी केली असून या चौकशीतून इतर सूत्रधारांचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध आयपीसी आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर राज्याचे गृह व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी याप्रकरण दखल घेत पोलिसांना आरोपीविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version