मुंबईत कुठे कुठे जाणार पंतप्रधान मोदी ?

मुंबईत कुठे कुठे जाणार पंतप्रधान मोदी ?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी मुंबईत येणार आहेत.

नरेंद्र मोदींचे १९ जानेवारीला दुपारी ४:४५ वाजेपर्यंत मुंबईत आगमन होईल. त्यानंतर मुंबईतील विविध प्रकल्प आणि सेवांचं लोकार्पण तसेच भूमिपूजन करून मोदी अंधेरीतील गुंदवली स्थानकावर येतील. गुंडावली हे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील मेट्रो सेवेचे महत्त्वाचे जंक्शन असून तिथून प्रवाशांना घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोचा प्रवास शक्य असेल. बृहन्मुंबई महानगर पालिकेची निवडणूक येत्या काळात अपेक्षित असल्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा मुंबई दौरा महत्वाचा असणार आहे.

दुपारी ४:४५ ला पंतप्रधान मोदी यांचे मुंबई विमानतळावर आगमन
सायंकाळी ५ ते ६:१० पर्यंत एमएमआरडीए मैदानात विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा
संध्याकाळी ६:३० वाजता अंधेरीतील गुंदवली मेट्रो स्थानकावर आगमन
सायंकाळी ६:४० वाजता मेट्रोचे उदघाटन आणि प्रवास
सायंकाळी ७:१५ ला नवी दिल्लीला रवाना होणार

 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version