चेन्नई : विंडिजने टीम इंडियाचा ८ विकेटने पराभव केला आहे. टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या २८८ धावांचे आव्हान विंडिजने २ विकेट गमावून पूर्ण केले. शिमॉरन हेटमायर आणि शाई होप या विजयाचे शिल्पकार ठरले. याविजयासह विंडिजने ३ वनडेच्या सीरिजमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे.
विजयी धावांचं पाठलाग करायला आलेल्या विंडिजला ५ व्या ओव्हरच्या सुरुवातीस पहिला झटका दिला. दिपक चहरने सुनील एमब्रीसला एलबीडबल्यू केले. यानंतर आलेल्या शिमॉरन हेटमायर आणि शाई होपने टीम इंडियाच्या बॉलर्सचा चांगलाच समाचार घेतला.
या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी २१८ रनची पार्टनरशीप केली. तसेच या दोघांनी शतकी कामगिरी देखील केली. शिमॉरन हेटमायरने १३९ तर शाई होपने १०२ रन केल्या.
टीम इंडियाकडून दीपक चहर आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी १ विकेट घेतला.
त्याआधी विंडिजने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडले. बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाची अडखळत सुरुवात झाली. मात्र गेल्या काही मॅचपासून आउट ऑफ फॉर्म असलेल्या ऋषभ पंतने श्रेयस अय्यरच्या जोडीने टीम इंडियाचा डाव सावरला.
या दोघांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. टीम इंडियाला श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंतच्या जोरावर विंडिजला २८८ धावांचे आव्हान देता आले.
दरम्यान सीरिजमधील दुसरी मॅच १८ डिसेंबरला विशाखापट्टणम येथे होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.