मी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही- उर्मिला मातोंडकर

मी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही- उर्मिला मातोंडकर

गेल्या आठवड्यात काँग्रेसला रामराम ठोकल्यावर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आता कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करणार याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या उर्मिला यांनी 6 महिन्यांतच काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा दिला. यासंदर्भात त्यांनी पत्र लिहून आपली नाराजीही व्यक्त केली. मात्र काँग्रेस सोडल्यावर आता उर्मिला कोणत्या पक्षात दाखल होणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र त्याचं उत्तर खुद्द उर्मिला यांनीच दिलं आहे.

शिवसेनेत जाणार असल्याची केवळ अफवाच!

उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या बातम्यांना उधाण आलं आहे.

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याशी उर्मिला यांनी फोनवरून चर्चा केल्याच्याही बातम्या येत होत्या.

त्यामुळे उर्मिला काँग्रेसनंतर आता शिवसेनेतच प्रवेश करतील, अशी अटकळ होती.

मात्र, मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाहीय. प्रसारमाध्यमांनी अफवांकडे दुर्लक्ष करावं, अशा शब्दांत उर्मिला मातोंडकर यांनी चर्चांना विराम दिलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version