Freestyle Fighting Video Viral : मसाजसाठी घरी आलेल्या थेरपिस्टची महिलेसोबत फ्री-स्टाईल हाणामारी; दोघींची तू-तू…मैं-मैं कॅमेऱ्यात कैद

मुंबईच्या वडाळा परिसरात घरपोच सेवा देणाऱ्या अर्बन कंपनीशी संबंधित एक वादग्रस्त घटना समोर आली आहे.
Freestyle Fighting Video Viral : मसाजसाठी घरी आलेल्या थेरपिस्टची महिलेसोबत फ्री-स्टाईल हाणामारी; दोघींची तू-तू…मैं-मैं कॅमेऱ्यात कैद

मुंबई : मुंबईच्या वडाळा परिसरात घरपोच सेवा देणाऱ्या अर्बन कंपनीशी संबंधित एक वादग्रस्त घटना समोर आली आहे. मसाजसाठी घरी आलेल्या थेरपिस्टचे सेशन क्लायंट महिलेनं अचानक रद्द केल्यानंतर दोघींमध्ये वाद झाला. हा वाद पुढे मारहाणीपर्यंत पोहोचला. ही संपूर्ण घटना व्हिडिओमध्ये कैद झाली असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, थेरपिस्ट नियोजित वेळेत क्लायंटच्या घरी पोहोचली होती. मात्र काही कारणांमुळे क्लायंट महिलेनं सेशन रद्द केलं. यानंतर शुल्क, वेळ आणि रद्दीकरण धोरणावरून दोघींमध्ये वाद झाला. व्हिडिओमध्ये “छोडो उनको… आय कॉल द पोलीस”, असे शब्द ऐकू येत असून, परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अर्बन कंपनीसारख्या माध्यमातून घरपोच सेवा घेण्याचे प्रमाण मोठ्या शहरांमध्ये वाढले आहे. अशा सेवांमध्ये ग्राहक आणि सेवा देणाऱ्यांमधील संवाद, नियम आणि सुरक्षितता यावर आधीही प्रश्न उपस्थित झाले आहेत. सेवा रद्द करण्याच्या नियमांबाबत गैरसमज किंवा तणाव निर्माण झाल्यास प्रसंग हाताबाहेर जाण्याची उदाहरणे यापूर्वीही पाहायला मिळाली आहेत. 

हेही वाचा : Maharashtra Weather Update: हुडहुडी गायब, आता उकाडा वाढणार; हवामानाचा मोठा यू-टर्न, नेमकं काय घडतंय?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version