अवकाळी पावसाचा द्राक्ष बागायतदारांना फटका

अवकाळी पावसाचा द्राक्ष बागायतदारांना फटका

  राज्यात ठिकठिकाणी थंडीची चाहूल लागली आहे. मात्र अवकाळी पावसाने राज्यात शेतकऱ्यांच्या शेती, फळबागांचे नुकसान केले आहे. सांगली जिल्ह्यात सलग पाऊस पडल्यामुळे ८० हजार एकरांपैकी ६५ हजार एकरांवरील द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. अवकाळी पावसामुळे ७० टक्के द्राक्षांचे नुकसान झाले आहे.

  सांगलीमध्ये सलग एक आठवडा अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पीक छाटणी घेतलेल्या द्राक्षबागांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे. तसेच द्राक्षांना घडकूज, मणीगळ, दावण्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे ६५ हजार एकरांवरील द्राक्षबागांचे ७० टक्क्यापर्यंत नुकसान झाले आहे. तसेच आणखी चार दिवस ढगाळ हवामानाचा इशारा हवामान खात्याने इशारा दिला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version