‘उद्धव गट-वंचित युतीचा मविआशी संबंध नाही’

‘उद्धव गट-वंचित युतीचा मविआशी संबंध नाही’

प्रकाश आंबेडकर यांची शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटाची युती झालेली आहे. त्याचा महाविकास आघाडीशी संबंध नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वक्तव्य केलं. याबाबत आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव नसल्याचे पटोले म्हणाले. ते गोंदियात एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांना प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाशी झालेल्या युतीबाबत विचारले असता ते बोलत होते. यावेळी पटोलेंनी भाजपवर देखील जोरदार टीका केली.

राज्याच्या राजकीय पटलावर शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकदा एकत्र आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी २३ जानेवारीला मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त या युतीची घोषणा करण्यात आली होती. या युतीचा महाविकास आघाडीशी कोणताही संबंध नसल्याचे पटोलेंनी वक्तव्य केलं आहे.

नाना पटोले यांनी यावर आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, प्रकाश आंबेडकर यांची उद्धव ठाकरे यांच्याशी युती झाली असून आंबेडकर यांचा महाविकास आघाडीशी काहीही संबंध नाही. आंबेडकरांना महाविकास आघाडीत घेण्याचा प्रस्तावही आमच्याकडे आलेला नाही. त्यामुळे आंबेडकर यांची महाविकास आघाडीतील एन्ट्री केवळ मनघडन कहाणी आहे. प्रकाश आंबेडकरांबद्दल आम्हाला काही बोलायचे नाही. आम्ही त्यांना प्रस्ताव दिलेला नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version