गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार उडवला होता. महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत होते, तर मुंबई कोरोनाचा हॉटस्पॉट बनली होती. या पार्श्वभूमीवर सर्वत्र टाळेबंदीची घोषणा करण्यात आली होती तर कोरोना निर्बंध पाळण्याचे अट घालण्यात आली होती. मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाल्यामुळे राज्यासह मुंबईतील कोरोना निर्बंध हटवण्यात आले. मात्र, मुंबईत पुन्हा कोरोनाच्या दोन नव्या विषाणूंनी डोकं वर काढलं आहे.
मुंबईत कोरोनाचे दोन नवीन विषाणू आढळले आहेत. ‘कापा’ आणि ‘एक्सई’ उपप्रकाराचे रुग्ण मुंबईत सापडले आहेत. मुंबईत एकूण २३० नमुन्यांमध्ये ओमायक्रॉनचे २२८ रुग्ण आढळले आहेत. तर एक रुग्ण कापा उपप्रकाराने तर अन्य एक रुग्ण एक्सई उपप्रकाराने बाधित असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, रुग्णालयात दाखल २१ रुग्णांपैकी कोणालाही प्राणवायू पुरवठा किंवा अतिदक्षता उपचारांची गरज भासली नसल्याची माहिती समोर आली आहे.
कोरोना विषाणूचा नवा उपप्रकार एक्सई विषाणूचा पहिला रुग्ण बुधवारी मुंबईत आढळला आहे. ओमायक्रॉनपेक्षा अधिक वेगाने पसरणारा हा विषाणू असल्याचे मानले जात आहे. दक्षिण आफ्रिकेतून हा विषाणू भारतात आहे. एक्सई बाधित ५० वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळली असून तीचे लसीकरण झाले आहे. ही महिला फेब्रुवारीत दक्षिण आफ्रिकेतून भारतात आली. भारतात आल्यावर या महिलेची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. परंतु, २ मार्च रोजी झालेल्या चाचणीनुसार संबंधित महिला पॉझिटिव्ह आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.