मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला आहे. मागच्या वर्षी २० जुलै रोजी मध्यरात्री १.२८ वाजता आणि यंदा २० जुलैलाच सकाळी ८.३० वाजता तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला.
तुळशी तलावाची पाणी साठवण्याची क्षमता ८०४६ दशलक्ष लिटर एवढी आहे. या तलावातून दररोज मुंबईला १८ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो.
मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापासून ३५ किमी अंतरावर तुळशी तलाव आहे. या तलावाचे बांधकाम १८७९ मध्ये पूर्ण झाले. मुंबईला पाणीपुरवठा करणारा हा सर्वात लहान तलाव आहे. यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सर्वात आधी तुळशी तलाव भरतो.
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी तुळशी तलाव आज (२० जुलै २०२४) सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी भरुन ओसंडून वाहू लागला आहे.#MumbaiRains #mybmcupdates pic.twitter.com/qUKxDyV0Ym — माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 20, 2024
मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव आणि त्यांची पाणी साठवण्याची क्षमता
मुंबईला दररोज होणारा पाणी पुरवठा – ३८०० दशलक्ष लिटर
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.