Dahisar-Bhayander Link Road: वाहतूक कोंडी फुटणार, दहिसर ते भाईंदर प्रवास आता फक्त पाच मिनिटांचा; जाणून घ्या प्रशासनाचा नवा प्रकल्प

दहिसर ते भाईंदर हा सध्या जवळपास तासभराचा प्रवास फक्त काही मिनिटांवर येणार आहे. मुंबई महापालिकेच्या दहिसर-भाईंदर लिंक रोड (DBLR) योजनेला हिरवा कंदील मिळाल्यानंतर या परिसरातील कनेक्टिव्हिटीमध्ये मोठा बद
Dahisar-Bhayander Link Road: वाहतूक कोंडी फुटणार, दहिसर ते भाईंदर प्रवास आता फक्त पाच मिनिटांचा; जाणून घ्या प्रशासनाचा नवा प्रकल्प

Dahisar-Bhayander Link Road: मुंबईतील वाहतूक कोंडीला मोठा दिलासा देणाऱ्या प्रकल्पाला सरकारकडून मंजूरी मिळाली आहे. दहिसर ते भाईंदर हा सध्या जवळपास तासभराचा प्रवास फक्त काही मिनिटांवर येणार आहे. मुंबई महापालिकेच्या दहिसर-भाईंदर लिंक रोड (DBLR) योजनेला हिरवा कंदील मिळाल्यानंतर या परिसरातील कनेक्टिव्हिटीमध्ये मोठा बदल घडणार आहे. तब्बल 2,337 कोटी रुपयांच्या या योजनामुळे पश्चिम उपनगरांवरील वाहतुकीचा ताण लक्षणीय कमी होणार आहे.  

कोस्टल रोडच्या शेवटच्या टप्प्याला नवी गती

DBLR हा कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याचा निर्णायक आणि अंतिम भाग मानला जातो. सहा पॅकेजमध्ये विभागलेल्या या टप्प्यात ‘F’ पॅकेजअंतर्गत गोराई-दहिसर जोडला जाणार आहे. एलिव्हेटेड कॉरिडॉरची सुरुवात कांदरपाडा मेट्रो स्थानकाजवळून होऊन हा रस्ता थेट भाईंदर पश्चिमेतील सुभाषचंद्र बोस गार्डनपर्यंत पोहोचेल. मार्गाचा काही भाग CRZ संवेदनशील क्षेत्रातून जात असल्याने त्याला पर्यावरणीय दृष्टीनेही महत्त्व आहे.  

हेही वाचा – Indigo Flight Cancellation : 1000 हून अधिक उड्डाणे रद्द; सुप्रिया सुळेंची इंडिगोवर कारवाई करण्याची केंद्र सरकारकडे मागणी

सध्याची त्रासदायक कोंडी होणार इतिहासजमा

आत्ता दहिसर-भाईंदर दरम्यान प्रवास करण्यासाठी पश्चिम द्रुतगती मार्ग हा पर्याय वापरावा लागतो. काशिमिरा आणि दहिसर चेक नाक्यावर कायम राहणारी कोंडी हा प्रवास 50–60 मिनिटांपर्यंत लांबवते. नवीन उन्नत मार्ग तयार झाल्यानंतर प्रवाशांना या कोंडीपासून पूर्ण मुक्तता मिळणार असून संपूर्ण प्रवास अवघ्या 5 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.

हेही वाचा –Uddhav Thackeray Strategy: कामगार संघटनांतील संघर्ष तीव्र; ठाकरे गटाने संघटना मजबूत करण्यासाठी सुरू केली खास मोहीम

रुंद एलिव्हेटेड रोड 

एकूण 4.58 किमी उन्नत रस्ता आणि दोन्ही टोकांवरील 3.64 किमी इंटरचेंज-रॅम्प या प्रकल्पात समाविष्ट आहेत. 45 मीटर रुंदीचा हा एलिव्हेटेड कॉरिडॉर वाहतूक क्षमता दुपटीने वाढवेल. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुमारे साडेतीन वर्षे लागतील, त्यामुळे 2029 पर्यंत हा मार्ग वापरासाठी खुला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रकल्पामुळे बचत, पर्यावरणीय लाभ आणि रोजगार

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की, दहिसर-भाईंदर दरम्यान 45 मीटर रुंदीचा उन्नत मार्ग  उभारण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची निविदा काढली आहे. हा कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याचा अंतिम टप्पा असून, पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. वेळ व इंधनाची बचत होण्याबरोबरच कार्बन उत्सर्जनात घट तसेच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version