Year Ender 2025 : यंदाच्या वर्षी ‘या’ गोलंदाजांचा राहिला दबदबा; सर्वाधिक विकेट्स घेतलेले टॉप 10 खेळाडू

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी हे अतिशय कठीण मानलं जातं.
Year Ender 2025 : यंदाच्या वर्षी ‘या’ गोलंदाजांचा राहिला दबदबा; सर्वाधिक विकेट्स घेतलेले टॉप 10 खेळाडू

क्रिकेट हा खेळ दिवसेंदिवस फलंदाजांचा खेळ होतं चालला आहे. छोटी मैदानं, उच्च दर्जाच्या बॅट्स आणि फलंदाजीला अनुकूल असणाऱ्या खेळपट्ट्या. या सगळ्या गोष्टींमुळे क्रिकेटमध्ये गोलंदाजी करणं कठीण होतं चाललंय. पण या सर्व गोष्टींना मात देत गोलंदाज त्यांच्या कलेच्या जोरावर आणि मेहनतीच्या जोरावर फलंदाजांपेक्षा वरचढ ठरतात. पण, घरगुती क्रिकेट किंवा लीग क्रिकेटमध्ये गोलंदाजी करणं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करणं यात खूप फरक असतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी हे अतिशय कठीण मानलं जातं. आपण जाणून घेऊया 2025 मध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज कोण आहेत?, या खेळाडूंच्या यादतीत भारतीय गोलंदाज किती आहेत?, हे सर्वकाही आपण जाणून घेऊया.  

हेही वाचा : Year Ender 2025 : 'या' फलंदाजांनी गाजवलं 2025 वर्ष; सर्वाधिक धावा करून टॉप 10 यादीत मिळवलं स्थान

1. जेकब डफी (न्यूझीलंड – जलदगती गोलंदाज) 
36 सामन्यात 81 विकेट्स
 

2. ब्लेसिंग मुजुबरानी (झिम्बाब्वे – जलदगती गोलंदाज) 
31 सामन्यात 65 विकेट्स
 

3. मॅट हेन्री (न्यूझीलंड – जलदगती गोलंदाज) 
27 सामन्यात 65 विकेट्स 

4. अली दाऊद (बहरीन – जलदगती गोलंदाज) 
37 सामन्यात 63 विकेट्स

5. कुलदीप यादव (भारत – फिरकी गोलंदाज)
25 सामन्यात 60 विकेट्स

6. मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया – जलदगती गोलंदाज) 
14 सामन्यात 58 विकेट्स

7. रिचर्ड नागरावा (झिम्बाब्वे – जलदगती गोलंदाज) 
35 सामन्यात 56 विकेट्स

8. जेडन सील्स (वेस्ट इंडिज – जलदगती गोलंदाज)
26 सामन्यात 56 विकेट्स

9. रिझवान बट (बहरीन – मध्यमगती गोलंदाज) 
34 सामन्यात 55 विकेट्स

10. अबरार अहमद (पाकिस्तान – फिरकी गोलंदाज)
34 सामन्यात 53 विकेट्स

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version