भारत, ऑस्ट्रोलिया, चीन, भूतान आणि न्यूझीलंडमधील 16 वास्तूंना युनेस्कोकडून पुरस्कार देण्यात आला आहे. सांस्कृतिक वारसा स्ठळांचं जतन व संवर्धनासाठी युनेस्कोकडून दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारासाठी 57 वास्तूंची नोंदणी 14 देशांमधून करण्यात आली होती. त्यामधून या 16 वास्तूंची निवड करण्यात आले आहेत.
मुंबईमधील फ्लोरा फाऊंटन, आवर लेडी ऑफ ग्लोरी चर्च, नेसेट एलियाहू सिनागॉन.
अहमदाबादमधील विक्रम साराभाई लायब्ररी आणि इंडियन इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट
अशा भारतातील चार हेरिटेज वास्तूंना युनेस्कोचा यंदाचा एशिया-पॅसिफिक पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.