टीम इंडियाने विंडिजला वनडेत 2-1 ने पराभूत करुन 2019 या वर्षाचा शेवट गोड केलाय. आगामी नववर्षात म्हणजेच 2020 या वर्षात टीम इंडियाचे भरगच्च क्रिकेट दौरे आहेत.
या नववर्षात टीम इंडियाचे सीनिअर असलेले 3 दिग्गज खेळाडू निवृत्ती घेऊ शकतात.
2020 वर्षात निवृत्त होणाऱ्यांच्या यादीत धोनीचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. टीम इंडियामध्ये धोनी सीनिअर खेळाडूंपैकी एक आहे. धोनीला क्रिकेटमध्ये 15 वर्षांपासून खेळतोय.
धोनीने 2004 साली बांगलादेशविरुद्ध वनडेत पदार्पण केलं होतं. धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाची प्रगती झाली.
धोनीने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला आयसीसी टी-20 वर्ल्ड कप, वनडे वर्ल्ड कप 2011 आणि चॅम्पिअनशीपचं विजेतेपद मिळवून दिलंय .
धोनी टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कॅप्टन राहिला आहे.
धोनीने क्रिकेटच्या तीन्ही फॉरमेटमध्ये मिळून जवळपास 22 हजार रन केले आहेत.
वाढत्या वयामुळे धोनीकडून आधीसारखी खेळी होत नाही. त्यामुळे धोनी या नववर्षात निवृत्ती घेऊ शकतो.
आश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2010 साली डेब्यू केलं होतं. आश्विन आयसीसी चॅम्पिअन स्पर्धेनंतर चमकला.
आर आश्विन टीम इंडियाचा अनेक वर्ष मेन स्पीनर होता. आश्विन टी-20 मधील आपली अखेरची मॅच 2017 साली खेळला होता.
आश्विनने तीनही फॉर्मेटमध्ये मिळून एकूण 564 विकेट घेतले आहेत.
टीम इंडियामध्ये नवनवे चेहरे आहेत. त्यामुळे सद्यपरिस्थितीत वनडे आणि टी-20 मध्ये आश्विनला स्थान मिळणे आतातरी कठीण वाटतं आहे.
आश्विनला आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्ये संधी न मिळाल्यास आश्विन वनडे आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करु शकतो.
सुरेश रैना टी-20 स्पेशालिस्ट खेळाडू आहे. मीडिल ऑर्डरमधील बॅटिंगसोबतच रैना दमदार फिल्डिंग देखील करतो.
रैना काही वर्ष टीम इंडियाच्या महत्वाच्या खेळाडूची भूमिका बजावली आहे.
रैनाने 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. रैनाने वनडेत 6 हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
टी-20 मध्ये टीम इंडियाकडून सर्वात आधी शतकी कामगिरी करणारा रैना हा पहिला खेळाडू आहे.
रैनाने 2018 साली जूलै महिन्यात इंग्लंड विरुद्ध अखेरची वनडे आणि टी-20 मॅच खेळला होता.
त्यामुळे रैना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून जवळपास दीड वर्ष दूर राहिला आहे.
त्यामुळे रैनाला आगामी दौऱ्यांमध्ये संधी मिळाली नाही तर, रैना देखील निवृत्तीचा विचार करु शकतो.
हे तीनही खेळाडू 33 किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे आहेत.
या तिघांपैकी धोनी हा सर्वात वयस्कर आहे. धोनी 38 वर्षांचा आहे.
तर आश्विन आणि रैना 33 वर्षांचे आहेत.
सर्वसाधारपण या वयात किंवा याआधीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतात.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.