मुंबईतील शाळांचे पहिली ते सातवीचे वर्ग आजपासून सुरु झाले. मुंबई क्षेत्रात तब्बल दीड वर्षाहून अधिक काळानंतर पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहे. इतक्या दिवसांपासून अखेर शाळेचे दार विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आल्यामुळे विद्यार्थी वर्ग आनंदी असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. शिक्षकांनी शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत केले आहे. विद्यार्थ्यांचे औक्षण करत त्यांना पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
आजपासून ठाण्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. तब्बल दोन वर्षांनी मोठ्या शहरातील सुरू झाल्या आहेत. कोरोनामुळे आणि ओमायक्रोनच्या सावटामुळे शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्या नंतर काही ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या. आणि आता ठाण्यातील शाळाही सर्व कोरोनाचे नियम पाळून सुरू झाल्या आहेत. ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल शाळेत सांताक्लोजने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले असून विद्यार्थी आनंदी दिसत होते. ठाण्यातील शाळेत सांताक्लॉजकडून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
मात्र शाळा सुरू करण्याबाबत पालक-विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत पालक-विद्यार्थ्यांनी संभ्रम बाळगू नये, असे आवाहन शिक्षणाधिकाऱ्यांनी केले आहे.
मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत प्रशासनाने नियमावली जारी केली आहे. शाळेतील सर्व शिक्षकांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पूर्ण लसीकरण होणे अनिर्वाय आहे. तसेच शाळेच्या परिसरात गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेश देऊ नये. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्य जास्त असल्यास शाळा दोन सत्रांमध्ये घ्याव्यात. एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी असणे बंधनकारक आहे. तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. शाळा सुरू करताना मुलांना टप्प्याटप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे. विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यास तत्काळ शाळा बंद करून शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करून घ्यावी.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.