परिचारिकेला रुग्णाकडून धमकी

परिचारिकेला रुग्णाकडून धमकी

मुंबई मनपाच्या राजावाडी रुग्णालयात एका रुग्णाने आणि त्याच्या कुटुंबियांनी शिवीगाळ करून एका परिचारिकेला धमकवल्याचा प्रकार घडला आहे. हेमलता किसन बांगारे या आपल्या सहकारी सोबत आयसीयु मध्ये काम करीत होत्या. इथे असलेले रुग्ण नूर मोहम्मद सत्तार शेकडे यांचा बेड दुरुस्त करीत असताना नूर मोहम्मद यांनी त्यांना शिवीगाळ केली. ही शिवीगाळ अतिशय अश्लील होती. त्यानंतर हेमलता यांना रडू कोसळले, त्यांनी झाला प्रकार वरिष्ठांना कळविण्यास जात असताना रुग्णांच्या नातेवाईक यांनी त्यांना शिवीगाळ करीत पुन्हा धमकावले. या नंतर हेमलता यांनी टिळक नगर पोलीस ठाणे गाठून या रुग्णाच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. या घटनेचा निषेध करीत अश्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांवर कठोर कारवाई ची मागणी या नर्सेस नी केली आहे.

परिचारिकेशी गैरवर्तन केल्याने सोमवारी निषेध आंदोलन केले. मात्र या ठिकाणी दोन युनियनमध्ये वाद दिसून आला. परिचारिकांमध्ये दोन गट पडल्याने एका परिचारिकांच्या गटाने काम बंद आंदोलनात सहभाग घेतला नाही. तर परिचारिकांचा दुसरा गट अधीक्षक कार्यालयात बैठकीसाठी निघून गेला. यावर राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. भारती राजुलकर यांनी बोलण्यास असमर्थता दर्शवली. दरम्यान, टिळकनगर पोलिस स्थानकात रविवारी रुग्णाच्या नातेवाईकाविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती देण्यात आली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version