‘मंगळवारी सभागृह चालू देणार नाही’ – चंद्रकांत पाटील

‘मंगळवारी सभागृह चालू देणार नाही’ – चंद्रकांत पाटील

एसटी महामंडळ राज्यशासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. गेल्या तीन महिन्यांहून अधिक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. मात्र, अद्याप कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघालेला नाही. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आक्रमक झाले आहेत. मंगळवारी सभागृह चालू देणार नाही, अशा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

राज्यात अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीवर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सभागृह बंद पाडणार असल्याचा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. मंगळवारी सभागृह चालू देणार नाही, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर आणण्याचे काम सुरू आहे. तसेच एसटीचे खासगीकरण करण्याचा ठाकरे सरकारचा डाव असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले की, ‘महाविकास आघाडी सरकारला एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा तिढा सोडवण्याची इच्छा नाही. या सरकारला सर्व एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावायचे आहे. एसटी महामंडळाचे खासगीकरण करण्याचा या सरकारचा डाव आहे.’

एसटी महामंडळ राज्यशासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे लालपरी रस्त्यावर धावत नाही आहे. राज्यात अनेक ठिकाणी एसटी बस बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवाशांना प्रवास करण्यासाठी इतर खाजगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. तसेच हे वाहनचालक प्रवाशांकडून कमी अंतराच्या प्रवासासाठीदेखील जास्तीचे पैसे आकारत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खीशाला कात्री लागत आहे. तसेच जोवर विलिनीकरण होत नाही, तोवर एसटी कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत. तर या संपादरम्यान अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

त्यामुळे, एसटी प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात भडका उडत आहे. ठाकरे सरकारकडून अद्याप कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघालेला नाही, तर आता एसटी संपाप्रश्नी चंद्रकांत पाटील आक्रमक झाले असून त्यांनी मंगळवारी थेट सभागृह बंद पाडण्याचा इशारा दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version