प्रवीण दरेकरांवर अपात्रतेची टांगती तलवार

प्रवीण दरेकरांवर अपात्रतेची टांगती तलवार

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरकेर यांन सहकार विभागाने मोठा धक्का दिला आहे. सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना अपात्र ठरवले आहे. मुंबै जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत प्रवीण दरकेर मजूर आणि नागरी सहकार बँक या दोन्ही वर्गातून निवडून आले. मात्र सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवले आहे. त्यामुळे आता दरेकरांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.

गेली अनेक वर्षे भाजप आमदार प्रवीण दरेकर हे बँक अध्यक्ष म्हणून मजूर वर्गातून निवडून येत आहेत. मात्र मजुर म्हणजे, अंगमेहनत करणारी, शाररिक श्रमातून मजुरी करणारी व्यक्ती. मात्र यासर्वामध्ये प्रवीण दरेकर कोणत्या अनुषंगाने मजूर वर्गात मोडतात, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना अपात्र ठरवत मजूर असल्याचे सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबै जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. सहकार पॅनलला मुंबई बँक निवडणुकीमध्ये १०० टक्के यश मिळाले असून २१ पैकी २१ जागांवर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र, सहकार विभागाने दरेकरांना अपात्र ठरवल्यामुळे त्यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version