‘साखर कारखान्यांना हमी मिळणार नाही’ – अजित पवार

‘साखर कारखान्यांना हमी मिळणार नाही’ – अजित पवार

राज्यातील साखर कारखान्यांबाबत महाविकास आघाडी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य सरकार यापुढे सहकारी किंवा खासगी अशा कोणत्याही साखर कारखान्यांना हमी देणार नसल्याची घोषणा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत केली आहे.

राज्यातील कोणत्याही साखर कारखान्यांना हमी मिळणार नसल्याचा मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची घोषणा अजित पवार यांनी विधानसभेत केली आहे. त्यामुळे इथून पुढे राज्य सरकारवर कारखाने अवलंबून राहू नयेत, असे अजित पवारांनी सांगितले आहे. दरम्यान, कारखानदारी चालावी पण सरकार प्रत्येकवेळी हमी घेणार नसल्याचे अजित पवार म्हणाले.

साखर कारखान्यांना हमी मिळणार नसल्याची घोषणा अजित पवारांनी केल्यानंतर विरोधकांन राज्य सरकारच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. कारखान्यांना थकहमी मिळाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे आता साखर कारखान्यांच्या निर्णयावरून पुन्हा सत्ताधारी-विरोधक आमने सामने येण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version