दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. राज्यात ठिकठिकाणी ऑफलाईन परीक्षेविरोधात विद्यार्थी आंदोलन करत आहेत. तर, मुंबईतील धारावी येथील शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. यावेळी आंदोलककर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.
ऑफलाईन परीक्षा रद्द करून परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यामुळे आज धारावीयेथील शिक्षणमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. तसेच नागपूरसह औरंगाबादमध्ये ऑफलाईन परिक्षेच्या विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.