बेवारस वाहनांचा लवकरच लिलाव

बेवारस वाहनांचा लवकरच लिलाव

मुंबई महानगर क्षेत्रात रस्त्यांच्या कडेला अनेक वाहने बेवारस अवस्थेत ठेवलेली दिसतात. रस्त्यांच्या कडेला असणारी ही वाहने वाहतुकीस अडथळा ठरतात. त्यामुळे अशी वाहने उचलून नेण्याची कार्यवाही महानगरपालिका प्रशासनाने सुरू केली आहे. कोरोना काळात रस्त्यांच्या कडेला असलेल्या वाहनांवर कारवाईचे काम महानगरपालिकेतर्फे वाहतूक पोलिसांना सोपविण्यात आले आहे.

पोलिसांच्या कारवाईनुसार, मागील आठवड्यांमध्ये एकूण २ हजार ३८१ वाहनधारकांना प्रशासनाने नोटीस बजावली आहे. त्यानंतर ३७९ जणांनी तत्काळ आपली वाहने स्वतःहून हटवली. तर ७८२ बेवारस वाहने प्रशासनाने जप्त करून उचलली आहेत.

तर, महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आलेल्या वाहनांचा लवकरच लिलाव होणार आहे. त्यामुळे जप्त झालेली वाहने तात्काळ सोडवा, अन्यथा ही वाहने लवकरच लिलावात निघणार आहेत. आवश्यक परवाना प्राप्त करून लिलाव होणार असल्याची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version