पालघर जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांचा मूक निषेध मोर्चा

पालघर जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांचा मूक निषेध मोर्चा

पालघर जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांकडून पालघर आगार ते विभागीय कार्यालय पालघर असा मूक निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बोईसर, पालघर, सफाळे, नालासोपारा, वसई, जव्हार, अर्नाळा, डहाणू येथील संपकरी एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेतला होता.

नियमांचे उल्लंघन न करता एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांवर दबावतंत्र वापरत असून याच्या निषेधार्थ या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांकडून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला असून या मोर्चात एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिला आणि लहान बालकांचाही समावेश होता.

एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. तसेच विलिनीकरणाची मागणी पूर्ण होईपर्यंत राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र तरिही कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. तसेच राज्य सरकारने सोमवारी सर्व कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन दिले होते. तसेच कामावर हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहेत. तरीही कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version