शक्ती कायद्यातील सुधारणा अहवाल अधिवेशनात सादर

शक्ती कायद्यातील सुधारणा अहवाल अधिवेशनात सादर

आता महाराष्ट्रातही शक्ती कायदा लागू होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शक्ती कायद्यातील सुधारणांचा अहवाल सभागृहासमोर मांडला. शक्ती कायद्यामुळे लैंगिक अत्याचार, विनयभंग करणाऱ्या आरोपीला तीन महिने शिक्षा किंदवा दंड ठोठावण्यात येणार आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शक्ती कायद्यातील संयुक्त समितीच्या अहवालातील काही ठळक तरतुदी सांगितल्या आहेत. कलम १८ क अन्वये खोटी तक्रार दाखल केल्यास तीन वर्षांपर्यंत शिक्षा आणि एक लाख रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात येणार आहे. लैंगिक अपराधाबाबत खोटी तक्रार केल्यास, निरपराध व्यक्तीला अडकवण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई करून दंड ठोठावण्याचा अधिकार देखील या कायद्यात प्रस्तावित केला आहे.

गत वर्षी झालेल्या हिवाळी अधिवेशनात शक्ती कायदा विधेयक मांडण्यात आले होते. तसेच हे विधेयक सभागृहांच्या संयुक्त चिकित्सक समितीकडे पाठवण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर आता नव्या सुधारणांसह शक्ती कायदा विधेयक आज मांडण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version