मुंबई : केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयातील विकास आयुक्त (हातमाग) यांच्या सहकार्याने नॅशनल डिझाइन सेंटरच्या (एनडीसी) वतीने मुंबई साडी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. वरळीतील नेहरू सेंटर येथे साडी महोत्सव ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत आयोजित केला जाईल. यात सुमारे ७० हातमाग विणकर, स्वयंसहायता गट आणि विविध सहकारी संस्था सहभागी होणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.