Sanjay Raut: ठाकरे बंधू बाजूला, युतीचा शुभमुहूर्त; राऊत काय म्हणाले एकदा वाचाच

संजय राऊत म्हणाले की, ही युती केवळ निवडणुका जिंकण्यासाठी झालेली नसून ती महाराष्ट्र आणि मुंबईच्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी आहे.
Sanjay Raut: ठाकरे बंधू बाजूला, युतीचा शुभमुहूर्त; राऊत काय म्हणाले एकदा वाचाच

Sanjay Raut on Uddhav-Raj Yuti in the PC : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ऐतिहासिक संयुक्त पत्रकार परिषदेची सुरुवात करताना शिवसेना (उबाठा) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी या भेटीला केवळ राजकीय युती न म्हणता ‘बाळासाहेबांच्या कुटुंबाचे पुनर्मिलन’ असे संबोधले. “आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण आहे, कारण संपूर्ण ठाकरे कुटुंब आणि दोन्ही शिवशक्ती एकत्र आल्या आहेत,” अशा शब्दांत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.

संजय राऊत पुढे म्हणाले की, ही युती केवळ निवडणुका जिंकण्यासाठी झालेली नसून ती महाराष्ट्र आणि मुंबईच्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी आहे. दिल्लीतील सत्ताधाऱ्यांकडून ज्या पद्धतीने मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा आणि महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे, त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हे दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत, असे त्यांनी ठामपणे मांडले.

हेही वाचा – Raj-Uddhav Thackeray Yuti:ठाकरेंकडून युतीची अधिकृत घोषणा; मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव-राज एकत्र

महाराष्ट्राच्या ऐक्याचा मंगलकलश

राऊत म्हणाले, “येथे जमलेली गर्दी पाहता असं स्पष्ट दिसत आहे की, आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी आणि प्रत्येक मराठी माणसासाठी अत्यंत मंगलमय आणि प्रेरणादायी आहे. ज्याप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राच्या ऐक्याचा मंगल कलश राज्यात आला आणि मराठी माणसाने आनंदोत्सव साजरा केला, अगदी तसाच मराठी ऐक्याचा मंगल कलश आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महाराष्ट्रासाठी घेऊन आलेले आहेत आणि त्यांनी तो महाराष्ट्राला अर्पण केला आहे.”

दरम्यान, संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना आजच्या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले आणि विरोधकांवर सडकून टीका केली. उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे हे भारतीय जनता पक्षाचे आणि शिंदे गटाचे काम आहे. उत्तर भारतीयांना, हिंदी भाषिकांना अस्वस्थ करण्याचे काम त्यांचेच आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला.

हेही वाचा – Sanjay Raut On Thackeray Alliance: राज आणि उद्धव ठाकरे यांची युती; राऊत म्हणाले, ‘राम-लक्ष्मण एकत्र आलेत’

शेवटी राऊत यांनी स्पष्ट केले की, आगामी 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत ही युती अभेद्य राहील आणि मुंबईवर पुन्हा एकदा भगवा फडकेल. “आता कोणताही संघर्ष घराघरात उरलेला नसून तो आता महाराष्ट्राच्या शत्रूंविरुद्ध असेल,” असे सांगत त्यांनी या पत्रकार परिषदेची औपचारिक प्रस्तावना पूर्ण केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत युतीची अधिकृत घोषणा केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version