सोसायट्यांमधील लसीकरणाबाबत सुधारित नियमावली जाहीर

सोसायट्यांमधील लसीकरणाबाबत सुधारित नियमावली जाहीर

महाराष्ट्रात बोगस लसीकरण झाल्याच्या घटना उघड होऊ लागल्या आहेत. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहचले आहे.
बनावट लसीकरण रॅकेट उघड झाल्यानंतर मुंबईतील तब्बल २६०० लाभार्थींना लसीऐवजी ग्लुकोजचे पाणी देण्यात आल्याचे समोर आले. याप्रकरणात दोषी
आढळलेल्या शिवम रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याची सूचना मुंबई पोलिसांनी केली होती. त्यानुसार महापालिकेने शुक्रवारी या रुग्णालयाला सील केले आहे. तसेच अशा प्रकारांना चाप लावण्यासाठी सोसायट्यांमधील लसीकरणाबाबत सुधारित नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

सोसायट्यांसाठी लसीकरण मोहिमेची नियमावली

नोंदणीकृत खासगी कोरोना लसीकरण केंद्रामार्फत लसीकरण मोहीम राबवण्याचे बंधनकारक

निवडलेले खासगी लसीकरण केंद्र हे नोंदणीकृत आहे का याची तपासणी व्यवस्थापन किंवा सोसायट्यांचे सचिव यांनी करावी

सोसायटीचा सचिव हा खासगी लसीकरण केंद्राशी समन्वय साधण्यासाठी नोडल ऑफिसर म्हणून काम करेल.

लसीकरणासाठी सोसायटीच्या आवारात आवश्यक असलेल्या सुविधा देण्याची जबाबदारी नोडल ऑफिसरने सांभाळावी.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version