राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना धमकी देत खंडणी मागणाऱ्या रेणू शर्मा या महिलेला अटक करण्यात आली आहे. मुंडे यांना धमकी देत खंडणी मागितल्याप्रकरणी रेणू शर्माला किल्ला न्यायालयात हजार करण्यात आले होते. याप्रकरणी सुनावणी पार पडली असून रेणू शर्माला शनिवारपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
धनजंय मुंडे यांच्याकडे एका महिलेने पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. पैसे न दिल्यास तुमच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल करेन आणि तुमची समाज माध्यमांवर बदनामी करेन, अशी धमकीही या महिलेने धनजंय मुंडे यांना दिली होती. धनंजय मुंडे यांनी संबंधित महिलेच्या विरोधात मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुंडेंच्या तक्रारीनंतर रेणू शर्मा महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून रेणू शर्माला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
धनंजय मुंडे यांनी तक्रार केली की, आरोपी महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार केली होती. ती तक्रार त्यांनी मागे घेतली होती, पण त्यानंतरही त्या महिलेने यावर्षी फेब्रुवारी ते मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून दूरध्वनी करून पाच कोटी रुपये किमतीचे दुकान, महागड्या मोबाईलची मागणी केली होती. तसे न केल्यास समाज माध्यमांवर बदनामी करण्याची धमकी दिली होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.