राणे पिता-पुत्राला अटकपूर्व जामीन मंजूर

राणे पिता-पुत्राला अटकपूर्व जामीन मंजूर

दिशा सालियनवर मृत्यूपूर्वी लैंगिक अत्याचार झाल्याचे आरोप करणाऱ्या राणे पिता-पुत्राला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राणे पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, दिंडोशी सत्र न्यायालयाने त्यांचा अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे.

दिशा सालियनबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राणे पिता-पुत्र यांच्याविरोधात मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आज दिंडोशी न्यायालयात राणे पिता-पुत्राला जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल केल्याचा आरोप नितेश राणेंनी केला आहे.

न्यायालयाने राणेंचा जामीन मंजूर केल्यानंतर नितेश राणे यांनी निर्णयाचे स्वागत करत न्यायालयाचे आभार मानले आहेत. आम्ही कोणा विरोधात अन्याय  होत असेल तर त्याला न्याय देण्याचे काम करतो असेही ते म्हणाले. तसेच दिशा सालियन प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणीही नितेश राणे यांनी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version