राखी जाधव मुंबई राष्ट्रवादी अध्यक्षपदी?

राखी जाधव मुंबई राष्ट्रवादी अध्यक्षपदी?

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना अटक केल्यानंतर मुंबई राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार राखी जाधव यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत या निर्णयाची चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राखी जाधव या घाटकोपर मतदारसंघाच्या उमेदवार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची गुरुवारी सायंकाळी ५ वाजता बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत राज्यातील राजकारणाबाबत चर्चा झाली असल्याचे समजत आहे. या बैठकीत नवाब मलिकांचा राजीनामा तसेच राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यकारी अध्यक्षपदाची नियुक्ती यावर चर्चा झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version