मुंबई महापालिकेकडून छत्रपती शिवाजी मंडई ऐरोलीला स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा स्थानिक मासळी बाजारातील कोळी बांधवांनी तीव्र निषेध केला होता. तसंच या निर्णयाविरोधात त्यांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी मनसे स्थानिक कोळी बांधवांच्या सहाय्यतेसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर राज ठाकरे यांनी आज पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची भेट घेतली.
भेटीचा मुख्य विषय क्राँफर्ड मार्केटजवळील छत्रपती शिवाजी मंडईचे स्थलांतर हा आहे.
मनसेने विरोध केला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची भेट घेत आहेत
शिवाजी मंडई मधील मच्छिमारांनी ऐरोलीला जाण्यास नकार दिला आहे ,
याआधी सर्व मासेविक्रेते आणि कोळी महिलांनी, राज ठाकरे यांची कृष्णकुंज बंगल्यावर ही भेट घेतली होती
https://www.jaimaharashtranews.com/%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%89%e0%a4%ab%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a1-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%b3%e0%a5%80/
त्यानंतर, शिवसेनेनं तातडीवं आम्ही देखिल कोळी बांधवांच्या बाजूनं आहोत, आणि हे स्थलांतर होऊ देणार नाही असं आश्वासन दिलं…
https://www.jaimaharashtranews.com/%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%90%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%80/
त्यामुळे, या विषयाला आता मनसे -शिवसेना श्रेयवादाचा रंग आलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.