एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या न करण्याचे राज ठाकरेंचे आवाहन

एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या न करण्याचे राज ठाकरेंचे आवाहन

  मुंबईतील आझाद मैदानावर सलग दुसऱ्या दिवशीही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. आझाद मैदानावर एसटी कामगार आक्रमक झाले असून ठिय्या आंदोलनात महिला कर्मचारी मोठ्या प्रमाणावर सहभागी झालले आहेत. आता एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात आता मनसेने उडी घेतली आहे. आज एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

  एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची भेटीनंतर आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या न करण्याची कळकळीची विनंती राज ठाकरे यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणखी चिघळू नये यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात राज ठाकरे स्वत: लक्ष घालणार असून लवकरच ते राज्य सरकारशी संवाद साधून कर्मचाऱ्यांशी बोलणार आहेत. यासंबंधीत माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात राज ठाकरे यांचा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा असल्याची ग्वाही त्यांनी त्यांनी दिली आहे.

  एसटी कर्मचाऱ्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवसस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीत कर्मचाऱ्यांनी आपल्या सर्व व्यथा त्यांच्या समोर मांडल्या आहेत. राज ठाकरे आमच्या मागणीचा विचार करून आम्हाला पाठिंबा देतील अशी अपेक्षा एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली  आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या न करण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version