नव्या वर्षपासून रेल्वे प्रवास महागणार

नव्या वर्षपासून रेल्वे प्रवास महागणार

महागाईत होरपळून निघणाऱ्या जनतेला आणखी एका दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. रेल्वेतर्फे भाडेवाढ करण्यात येणार आहे.

या नव्या भाडेवाढीची अंमलबजावणी नवर्षापासून करण्यात येणार आहे.

रेल्वेने मंत्रालयाने ट्विट करुन दरवाढीची माहिती दिली आहे.

या दरवाढीमुळे रेल्वेने लांबचा प्रवास करणाऱ्यांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे.

रेल्वेची ही भाडेवाढ नॉन एसी सेकंड क्लास, स्लीपर क्लास आणि फर्स्ट क्लाससाठी असणार आहे. ही दरवाढ दर किमीमागे 1 पैसे अशी असणार आहे.

तसेच मेल एक्सप्रेस गाडीतील सेंकड क्लाससाठी दर किमी 2 पैसे मोजावे लागणार आहेत.

सोबतच स्लीपर आणि फर्स्ट क्लाससाठी देखील प्रति किमी 2 पैशांची दरवाढ करण्यात येणार आहे.

एक्सप्रेसमधील एसीसाठी देखील ही भाडेवाढ असणार आहे.

एसीतील चेअर कारसाठी एक किलोमीटर मागे 4 पैसे अधिकचे मोजावे लागणार आहेत.

तसेच एसी-3 टायर, एसी-2 टायरसाठी आणि एसी फर्स्ट क्लासमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रति किमी 4 पैसे मोजावे लागणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version