राज्य सरकारची पूरग्रस्तांसाठी 6 हजार 800 कोटींची केंद्र सरकारकडे मागणी

राज्य सरकारची पूरग्रस्तांसाठी 6 हजार 800 कोटींची केंद्र सरकारकडे मागणी

आठवड्याभरापासून पश्चिम महाराष्ट्रासह अनेक भागात पावसाने थैमान घातले आहे. तर कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात लोकांचे मोठे नुकसान झालं आहे. तसेच कोकण, नाशिक या भागातही असेच नुकसान झालं आहे. अनेक लोकांचे अख्खे संसार पाण्यामध्ये वाहून गेले आहेत. त्यामुळे पूर ओसरल्यानंतर पूनर्वसनाचं मोठं आव्हान सरकारपुढे उभे राहिले आहे. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी 6 हजार 800 कोटींची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.

पूरग्रस्तांसाठी 6 हजार 800 कोटींची मागणी

सांगली, कोल्हापूरसह, कोकण आणि नाशकात गेल्या आठ दिवसात या भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागातील अनेक गावे, जनावरे आठ दिवस पाण्याखाली असल्याने पूनर्वसनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकांची घरे, रस्ते यांच मोठं नुकसान झालं आहे. या महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी 6 हजार 800 कोटींची मागणी केंद्र सरकारने केली आहे. या पुरामध्ये ज्यांची घरं पडली, वाहून गेली त्यांना त्यांची घरं सरकार बांधून देणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

यामध्ये रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 576 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी 4700 कोटींची तरतूद करण्यात आला आहे. कोकणासाठी 2107 कोटी तर पडझड झालेल्या घरांच्या बांधणीसाठी 222 कोटी देण्यात आले आहे. रस्ते,पुलांच्या बांधकामासाठी 876 कोटी देण्यात आले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version