मुंबईमध्ये लोकलने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस अधिक वाढ होताना दिसून येत आहे. मात्र याचा परिणाम महिलांवर अधिक होत असलेला दिसून येत आहे. त्यातल्या त्यात पण गर्भवती महिलांनादेखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. लोकलमध्ये विविध श्रेणींसाठी डबे राखीव असून गर्भवती महिलांसाठीही एक स्वतंत्र डबा राखीव ठेवण्याची मागणी होत आहे.
मुंबई महापालिकेतही स्थायी समिती अध्यक्षांनी गर्भवती महिलांसाठी राखीव डब्याच्या ठरावाची सूचना मांडली आहे. येत्या 9 एप्रिल रोजी महापालिका सभेत ही सूचना मांडली जाणार आहे.
गर्दीच्या वेळी रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणे गर्भवती महिला आणि त्यांच्या बाळासाठी धोक्याचे ठरू शकते. सध्या गर्भवतींसाठी रेल्वेगाड्यांमध्ये स्वतंत्र डब्याची व्यवस्था नसल्याने त्यांना दिव्यांगांसाठी आरक्षित डब्यातून प्रवास करावा लागतो.
हेही वाचा – Panchvati Express : एक डबा मागे सोडूनच पंचवटी एक्स्प्रेस सुटली! तिकीट परताव्याचीही रेल्वेकडून व्यवस्था
ही वस्तुस्थिती लक्षात घेता गर्भवती महिलांसाठी एक स्वतंत्र डबा आरक्षित ठेवण्यात यावा, अशी ठरावाची सूचना स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याकडून मांडली जाणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.