प्रवीण दरेकरांना अटकेपासून दिलासा नाही

प्रवीण दरेकरांना अटकेपासून दिलासा नाही

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना अटकेपासून दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. मजूर प्रकरणी दाखल गुन्ह्याअंतर्गत दरेकरांना अटक न करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे प्रविण दरेकरांना अटकेपासून दिलासा मिळालेला नाही.

मजूर प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी प्रवीण दरेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. दरम्यान, न्यायालयाने दरेकरांची याचिका फेटाळली असल्यामुळे दरेकरांना अटकेपासून दिलासा मिळाला नाही.

प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे याचे पडसाद मंगळवारी विधानसभेत पाहायला मिळाले. दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ विरोधकांकडून सभागृहात गोंधळ घालण्यात आला. तसेच प्रवीण दरेकर यांच्यावर सूडबुद्धीने गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे.

काय आहे प्रकरण?

प्रवीण दरेकर यांनी मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. प्रवीण दरेकर यांच्यावर माता रमाबाई आंबेडकर पलीस ठाण्यात भादवी कलम १९९, २००, ४०६, ४१७, ४२०, ४६५, ४६७ आणि १२० (ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आल आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version