महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे शरद पवार स्वत: मुंबईतील ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहणार असल्याचे शरद पवारांनी सांगितले. मात्र आता ईडीने ई-मेलद्वारे तुमच्या चोकशीची गरज नसल्याचे शरद पवारांना सांगितले आहे. भविष्यातही चौकशीची गरज पडली तर तुम्हाला कळवण्यात येईल असेही ई-मेलमध्ये लिहिलेले आहे. मात्र तरीही ईडीच्या कार्यालयावर जाणार असल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले होते. त्यामुळे पोलीस शरद पवारांचे मन वळवण्याचे प्रयत्न करत असून मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे शरद पवारांची भेट घेतली.
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यामुळे शरद पवार आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास ईडी कार्यालयावर जाणार होते.
मात्र ईडीने ई-मेलद्वारे तुमच्या चोकशीची गरज नसल्याचे शरद पवारांना सांगितले आहे.
भविष्यातही चौकशीची गरज पडली तर तुम्हाला कळवण्यात येईल असेही ई-मेलमध्ये लिहिलेले आहे.
मात्र तरीही ईडीच्या कार्यालयावर जाणार असल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले.
त्यामुळे पोलीस शरद पवारांचे मन वळवण्याचे प्रयत्न करत असून मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे शरद पवारांची भेट घेतली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.