छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेला खिंडार

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा शिवसेना कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेला खिंडार

२९ जुलै, २०२४, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा शिवसेना कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी सोमवारी कन्नडचे माजी आमदार आणि कन्नड साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष नितीन पाटील यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्टवादीत पक्षप्रवेश केला. ‘राष्ट्रवादी पक्षाच्या संकल्पनेतील महाराष्ट्र, ज्यामध्ये चिरंतन प्रगती आणि स्थैर्य आहे, अशा राष्ट्रवादी विचारांना पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे राष्ट्रवादीत स्वागत आहे’, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितीन पाटील यांचे स्वागत केले आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version