गांधींविषयीच्या वादग्रस्त ट्विटवर निधी चौधरींची फेसबुक पोस्टद्वारे सारवासारव

गांधींविषयीच्या वादग्रस्त ट्विटवर निधी चौधरींची फेसबुक पोस्टद्वारे सारवासारव

मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांनी गांधी यांचा फोटो नोटावरुन काढून टाकावा अशा अशयाचे ट्विट केले होते. त्यानंतर त्यांना चौफेर टीकेला समोरे जावे लागले होते. यामुळे त्यांनी काल फेसबूक पोस्टद्वारे त्यांच्या या विधानावर सारवासारव केली आहे. मी गांधीवादी विचारसरणीची असून मी महात्मा गांधींचे रोज स्मरण करते या पोस्टद्वारे त्यांनी ही सारवासारव केली आहे.

निधी यांच वादग्रस्त ट्विट

‘आपण महात्मा गांधी यांची 150 जयंती उत्साहात साजरी करत आहोत.

नोटांवरून गांधीजींचा फोटो हटविण्याची हीच वेळ आहे.

जगभरातील गांधीजींचे पुतळे हटविण्यात यावेत,

संस्था आणि रस्त्यांना देण्यात आलेली त्यांची नावं हटविण्यात यावीत.

हीच आपल्या सर्वांकडून त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असेल.

३० जानेवारी १९४८ साठी थँक्यू गोडसे!’, असं वादग्रस्त ट्विट त्यांनी केलं होतं.

फेसबुक पोस्टद्वारे सारवासारव

गांधीवादी विचारसरणीच्या असून महात्मा गांधींचे रोजच स्मरण करतो.

गांधीजींबाबत आपण केलेले ट्विट हे पूर्णपणे व्यंगात्मक होते. आणि या टिप्पणीचा चुकीचा अर्थ लावला गेला.

असे स्पष्टीकरण मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे दिले आहे.

साबरमती असो किंवा पोरबंदर जळगावातील जैन सोलारजवळील महात्माजींचे संग्रहालय,

तसेच  कोलकाता आणि चेन्नईतील महात्माजीचे वास्तव्य असलेली घरे,

मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान असो किंवा गांधीजींशी संबंधित कोणतीही जागा असो

ही सारी ठिकाणे आपल्यासाठी ‘चारधाम’ आहेत, अशा शब्दात चौधरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या  आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version