संसदेच्या उपहारगृहात नवीन मेनू

संसदेच्या उपहारगृहात नवीन मेनू

रविवारी पंतप्रधानांनी ‘मन कि बात’ मध्ये, ‘सरकार धान्यांचे उत्पादन आणि वापराला प्रोत्साहन देत असल्याने, भारतातील प्रत्येक जी – २० शिखर परिषदेत बाजरीचे पदार्थ असतील’, असे म्हणाले. त्यामुळे आता संसद भवनाच्या उपाहारगृहातही धान्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश केला जाणार आहे.

या नवीन मेनूमध्ये बाजरीचे सूप, नाचणी डोसा, नाचणी थत्ते इडली, ज्वारीचा उपमा आणि मका, बाजरी आणि ज्वारीची भाकरी, नाचणीची पुरी आणि बटाट्याची भाजी, बाजरीची खिचडी आणि लसणाची चटणी, बाजरीची टिक्की, बाजरी – कांद्याच्या मुठिया, शेंगदाण्याची चटणी आणि डोसा, राजगिऱ्याची कोशिंबीर असे इत्यादी पदार्थ असणार आहेत. मिठाईमध्ये केसरी खीर, नाचणी अक्रोडचे लाडू आणि बाजरी चुरमा यांचा समावेश आहे. भारतीय स्वयंपाकातील विविधता दर्शवणारा असा नवीन मेनू असणार आहे.

राष्ट्रपती भवनात साडेपाच वर्षे कार्यकारी शेफ असलेले आयटीडीसीचे मोंटू सैनी यांनी हा मेनू तयार केला आहे. हे पदार्थ संसदेच्या सर्व उपाहारगृहात उपलब्ध असतील आणि मध्यवर्ती सभागृहात खासदारांना दिले जातील. तसेच संकुलातील इतर उपाहारगृहातील थाळीमध्ये किमान एक बाजरीचा पदार्थ असणार आहे.
‘नवीन मेनू आरोग्यदायी असेल यावर भर दिला जाणार आहे त्यामुळे मिष्टान्नातही साखरेऐवजी गूळ वापरला जाणार आहे’, असे सैनी यांनी सांगितले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version