चंद्रकांत पाटलांना माझ्यावर पीएचडी करायला 10-12 वर्ष लागतील – शरद पवार

चंद्रकांत पाटलांना माझ्यावर पीएचडी करायला 10-12 वर्ष लागतील – शरद पवार

चंद्रकांत पाटलांना माझ्यावर पीएचडी करायला 10-12 वर्ष लागतील, असा टोला शरद पवार यांनी चंद्रकात पाटलांना लगावला आहे. शरद पवार हे मुंबईतील युवा संवाद कार्यक्रमात बोलत होते.

काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत विधान केलं होतं.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील ?

गेल्या पन्नास वर्ष राजकारणात असूनही दहाच्या वर खासदार निवडून आणता आले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर पीएचडी करण्याची इच्छा आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

भाजप देशावरची आपत्ती असल्याचं शरद पवार म्हणाले होते. या टीकेला प्रत्त्युतर देताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं होतं.

महाविद्यालयीन निवडणुका व्हायला हव्यात- शरद पवार

शरद पवारांनी यावेळेस महाविद्यालयीन निवडणुकांबद्दल भाष्य केलं.

महाविद्यालयीन निवडणुका व्हायला हव्यात, असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.

तसेच मी अभ्यास सोडून सर्व विषयांत पारंगत होतो, असंही शरद पवार म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version