नवाब मलिक पत्रकार परिषद :  जमीन खेरेदीच्या आरोपांवर मलिकांचे स्पष्टीकरण

नवाब मलिक पत्रकार परिषद :  जमीन खेरेदीच्या आरोपांवर मलिकांचे स्पष्टीकरण

  मुंबईतील कुर्ल्यामधील गोवावाला कम्पाउंड या तीन एकर जमिनीचा सौदा नवाब मलिकांच्या सॉलिडस्ट कंपनीसोबत झाला असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. या जागेचा सौदा तीस लाखांमध्ये करण्यात आला. तसेच बॉम्बस्फोटातल्या आरोपींकडून नवाब मलिकांनी जमिन खरेदी केल्याचा आरोप फडणवीसांनी मलिकांवर केला आहे. त्यावर नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे.

 नवाब मलिक म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी आरोप केलेली कुर्ल्यामधली जमिनीवर १९८४मध्ये मदिनेत्तूल आमान कोऑपरेटीव्ह हाउसिंह सोसायटी बांधण्यात आली. याच जागेला गोवावाल कंपाउंड असे म्हटले जाते. मुनिरा प्लंबर यांनी विकासकामाच्या मदतीने १४० ते १५० घरे बांधली. इमारतीच्या मागे झोपडपट्टीतील गोडाऊन मुनिरा यांनी ३० वर्षांपासून एका कंपनीला भाड्याने दिले आहे. आणि त्याच मालमत्तेत आमचीसुद्धा चार दुकाने होती. मुनिरा यांच्याकडून गोडाऊनचा मालकी हक्क घेण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे मुनिरा यांचा पॉवर ऑफ ऍटर्नी होल्डर सलीम पटेल होता. आणि आम्ही पटेलसोबत जमिनीच्या खरेदीचा व्यवहार केला असून उपलब्ध कागदपत्रांवर जागेची जी किंमत होती त्या किंमतीत आम्ही जमीन खरेदी केली. तसेच गोवावाला कंपाउंडमध्ये सरदार शाहवली खान यांचे घर आहे.

जमीन सौद्याबद्दल फडणवीसांचे आरोप  

  मुंबईतील कुर्लायेथील एलबीएस मार्गावरील गोवावाला कम्पाउंड या तीन एकर जमिनीचा सौदा सॉलिडस्ट नावाच्या कंपनीसोबत झाला आहे. ज्या सॉलिडस्ट कंपनीला ही जमीन दिली गेली आहे ती नवाब मलिक यांच्या कुटुंबियांची कंपनी आहे. फराज मलिक हे या सॉलिडस्ट कंपनीचे संचालक आहेत. या जागेचा सौदा तीस लाखांमध्ये करण्यात आला. या तीस लाखांपैकी वीस लाखांची रक्कम अदा झाली. तसेच जमिनीचा सौदा २५ रुपये चौरस फुटाने करण्यात आला. आजही त्यांना मासिक एक कोटी रुपयांचे भाडे मिळत आहे. सलीम पटेल आणि सरदार खान यांनी या जमिनीची विक्री केली आहे. त्यामुळे बॉम्बस्फोटातल्या आरोपींकडून नवाब मलिकांनी जमिनी खरेदी केल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. तसेच याबाबतचे सर्व पुरावे शरद पवार यांच्याकडे देणार असल्याचे देवेंद्र फडणवसी यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version