नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा मुद्दा चिघळला

नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा मुद्दा चिघळला

नवी मुंबई: नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद शिगेला पोहोचला असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आज सिडको घेराव आंदोलन करणार आहे. यावेळी तब्बल एक लाखांहून अधिक जण यात सहभागी होणार असून या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिडको कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आणि पनवेल मध्ये ५ हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी दाखल झाले आहेत. तसेच राज्य राखीव दलाच्या ७तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या माध्यमातून प्रत्येक गावाच्या मुख्य रस्त्यावर गावकऱ्यांना रोखण्यात येणार आहे.

आंदोलनावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याची खबरदारी घेऊन नवी मुंबईत अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसंच वाहतुकीतही मोठे बदल करण्यात आलेले आहेत. सकाळी ८ ते रात्री ८ कळंबोली ते बेलापुर आणि वाशी ते बेलापूर रस्त्यावर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

कोपरखैरणे ते सीबीडी, खारघर ते सीबीडी आणि नेरुळ ते सीबीडी अंतर्गत मार्ग राहणार पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच मुंबईतून पुण्याकडे जाणारी वाहतूक महापे शिळफाटा मार्गे पुण्याकडे जाईल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version