मुंबईत पोलीस अधिकाऱ्याचं कोरोनामुळे निधन

मुंबईत पोलीस अधिकाऱ्याचं कोरोनामुळे निधन

मुंबईत पोलीस अधिकाऱ्याचं कोरोनामुळे निधन झालं आहे. वाकोला पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोहन दगडे यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते ५४ वर्षांचे होते. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना बीकेसीमधील कोरोना सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथे उपचार सुरु असतानाच पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनामुळे आतापर्यंत १०१ कर्मचाऱ्यांच्या निधन झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकोला पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोहन दगडे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी बीकेसीमधील जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती खालवल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं होते. मात्र पहाटे ३.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version