Mumbai Local : ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकलचा खोळंबा! पश्चिम रेल्वेवरील विविध ठिकाणी पॉइंट फेल, गाड्या उशिराने

वसई रोड, दादर आणि गोरेगाव या महत्त्वाच्या स्थानकांजवळ पॉइंटमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.
Mumbai Local : ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकलचा खोळंबा! पश्चिम रेल्वेवरील विविध ठिकाणी पॉइंट फेल, गाड्या उशिराने

मुंबईकरांच्या लोकल प्रवासाला आज सकाळपासून तांत्रिक बिघाडाचा फटका बसला आहे. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर विविध ठिकाणी पॉइंट फेल झाल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे काही गाड्या उशिराने धावत असून काही लोकल थांबवून ठेवण्यात आल्याची माहिती आहे. बिघाड दुरुस्त करण्यासाठी रेल्वेचे कर्मचारी तातडीने कामाला लागले आहेत. वसई रोड, दादर आणि गोरेगाव या महत्त्वाच्या स्थानकांजवळ पॉइंटमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.

वसई रोडवर पहाटेपासून बिघाड

वसई रोड येथे DIVA DN/UP फास्ट मार्गावरील PT 111/112 पॉइंट पहाटे ४.४६ वाजता दोन्ही स्थितींमध्ये फेल झाला. घटनेची माहिती मिळताच DySS/BSR चे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पॉइंट क्लॅम्पिंगचे काम हाती घेण्यात आले असून या बिघाडामुळे UP फास्ट मार्गावरील लोकलला विलंब झाला.

 दादरमध्ये फास्ट मार्ग प्रभावित

दादर येथे UP फास्ट आणि DN फास्ट मार्गावरील 143/144 पॉइंट सकाळी १०.१० वाजता रिव्हर्समधून नॉर्मल स्थितीत येत नसल्याचे आढळले. परिणामी या मार्गावरील लोकल वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.

 गोरेगावमध्येही पॉइंट फेल

गोरेगाव येथे UP/DN हार्बर मार्गावरील 127/128 आणि 129/130 हे पॉइंट सकाळी १०.२२ वाजता फेल झाले. त्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. दरम्यान, तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी रेल्वेचे कर्मचारी प्रभावित ठिकाणी युद्धपातळीवर काम करत आहेत. पॉइंटची दुरुस्ती पूर्ण करून लोकल सेवा शक्य तितक्या लवकर सुरळीत करण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version